तापमान वाढल्यामुळे दुपारी घराबाहेर पडणंही लोकांसाठी कठीण झालं आहे. अशा परिस्थितीत लोक छत्री, पाण्याची बाटली, गॉगल्स आणि स्कार्फचा आधार घेत स्वतःला उष्णतेपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे
भरदुपारी एक जोडपं बाईकवरून प्रवास करत आहे. नवरा बाईक चालवत आहे आणि पत्नी मागे बसलेली आहे. पण, पुढच्याच क्षणी दिसणारं दृश्य पाहून लोक थक्क होतात, कारण उकाड्यापासून बचाव करण्यासाठी या नवरा-बायकोने एक भन्नाट जुगाड केला आहे. त्यांनी बाईकवरच एक अनोखी ‘छपराची व्यवस्था’ तयार केली आहे. या छतासाठी त्यांनी सुकलेलं गवत, काड्या आणि उपलब्ध साहित्याचा वापर केला असून ते थेट बाईकवर बसवले आहे; त्यामुळे चालत्या बाईकवरही त्यांना थेट सूर्यप्रकाशाचा त्रास कमी जाणवत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच काही वेळातच व्हायरल झाला. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ thehabibsaifi या युजरने पोस्ट केला असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या जोडप्याची ही अनोखी कल्पना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
का युजरने मजेशीर प्रतिक्रिया देत लिहिलं आहे की, “नीले ड्रमच्या काळात अशी मोहब्बत दुर्मीळ आहे,” तर दुसऱ्याने लिहिलं, “या जोडीने मन जिंकलं.”


