सद्गुरु कृषी महाविद्यालय ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमासाठी कृषी कन्यांचे वंजारवाडीत स्वागत

ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमासाठी कृषी कन्यांचे वंजारवाडीत आगमन

वंजारवाडी, जामखेड: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित सद्गुरु कृषी महाविद्यालय, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथील कृषी कन्या भोईटे राजश्री, भुजबळ ईश्वरी, गोफणे अंकिता, खरात वेदांतिका, बंडगर वैष्णवी, गजरमल स्नेहल व आटोळे प्रतीक्षा यांचे ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम २०२६-२७ अंतर्गत अभ्यास दौऱ्यानिमित्त जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे आगमन झाले.

ग्रामस्थांनी कृषी कन्यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी सरपंच कोमल प्रकाश जायभाय, उपसरपंच हरी आढाव, रमेश जायभाय, भागवत जायभाय, विष्णू जायभाय, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपक्रमाची माहिती:
ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रम चतुर्थ वर्षाच्या अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. यात विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, सामाजिक-आर्थिक परिस्थिती व शेतीतील समस्यांची प्रत्यक्ष माहिती मिळते. पुढील तीन महिने या विद्यार्थिनी गावात मुक्कामी राहून शेतकऱ्यांना हंगामानुसार पीक पद्धती, रासायनिक खतांचा योग्य वापर, कीटकनाशक फवारणीची काळजी, सेंद्रिय शेती, माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड-रोग व पीक संरक्षण याबाबत शास्त्रीय माहिती व प्रात्यक्षिके देणार आहेत. तसेच विविध कृषी विषयक कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत.

मार्गदर्शन:
या उपक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शंकर शेठ नेवसे, अध्यक्षा सौ. कल्याणी ताई नेवसे, सचिव श्री. राजेंद्र गोरे, प्रशासकीय अधिकारी श्री सखाराम राजळे, समन्वयक श्री राहुल म्हेत्रे, प्राचार्य डॉ. रामदास बिटे, कार्यक्रम समन्वयक प्रा. चांगदेव माने व कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रियंका जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles