विधानपरिषद निवडणूक…. महाराष्ट्रात कॉंग्रेस नेत्याची पक्षातून हकालपट्टी

शिवसेना ठाकरे गटानंतर काँग्रेसने देखील विधानपरिषदेच्या निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या उमेदवाराची पक्षातून हकालपट्टी केली आहे. शैलेश अग्रवाल यांना काँग्रेसने वर्धा गडचिरोली चंद्रपूर विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी दिली होती, परंतु त्यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे पक्षातून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांनी शैलेश अग्रवाल यांना निष्कासित करावे, अशी मागणी केली होती, त्यानुसार आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून . शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसकडून निवडणुकीतून माघर घेतलेल्या उमेदवारांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

कोकणातील रायगड -रत्नागिरी -सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नेते बाळ माने यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र ऐनवेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, त्यांनी देखील ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून या दोन्ही नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles