वैभव सूर्यवंशीला टीममध्ये संधी मिळाली; मला कधी?मंत्रिपदावरुन धनंजय मुंडेंची सुनेत्रा पवारांसमोर खदखद !

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एक नंबरचा करण्यासाठी आपल्याला सर्वांना संघर्ष आणि संकल्प करण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या जाहीर कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बोलताना मुंडे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी क्रिकेटचे उदाहरण देत, अप्रत्यक्षपणे कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्वतःची
ची इच्छा बोलून दाखवली.मंत्रिपदाव्यासपीठावरून बोलताना धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे आभार मानले. “अजित पवार यांनी माझ्यासारख्या रस्त्यावरच्या खड्याला घडवले आणि तीच दृष्टी आता मला सुनेत्रा पवार यांच्यामध्ये पाहायला मिळत आहे,” असे मुंडे म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात सुरू असलेल्या खेळाच्या विषयाचा धागा पकडत धनंजय मुंडे यांनी उपस्थितांची मने जिंकली. स्टेजवर उपस्थित नेत्यांकडे पाहत ते म्हणाले, “व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांना संधी मिळाली आहे. पण समोर बसलेले लोक विचारत आहेत की, क्रिकेटच्या खेळात आम्ही फक्त ‘१२ वे खेळाडू’ म्हणून आणि दुसऱ्यांच्या पाण्याचे ग्लास उचलण्यातच राहणार का? आम्हाला कधी मुख्य संघात खेळण्याची संधी मिळणार? मी आज फक्त तुमच्या भावना स्टेजवर मांडल्या आहेत, कारण मीसुद्धा तुमच्यातलाच एक आहे.”

या विधानातून मुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद मांडतानाच, स्वतःसाठीही मंत्रिपदाची इच्छा अप्रत्यक्षपणे व्यक्त केल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
पक्षातील संधी आणि निष्ठेवर बोलताना मुंडे यांनी थेट क्रिकेट विश्वातील उदाहरणे दिली. “खेळ असो वा राजकारण, एक गोष्ट निश्चित आहे. ज्या सूर्यकुमार यादवने देशाला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याला काही वेळा संघात स्थान मिळत नाही; तर दुसरीकडे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशीला थेट संघात संधी मिळते. याचाच अर्थ असा की, पक्षाने कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाला, त्याच्या निष्ठेला आणि कामाच्या मूल्यांकनाला सर्वश्रेष्ठ स्थान देणे गरजेचे आहे. जर आपण हे करू शकलो, तरच अजितदादांचे महाराष्ट्रातील स्वप्न आपण पूर्ण करू शकू,” असेही धनंजय मुंडे यांनी ठामपणे सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles