भारताचे प्रसिद्ध नेमबाज जसपाल राणा यांचं अकाली निधन

भारतीय क्रीडा जगतातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचे दिग्गज आणि प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक जसपाल राणा यांचे शुक्रवारी (12 जून 2026) निधन झाले आहे. ते ४९ वर्षांचे होते. आशियाई खेळांमधील माजी सुवर्णपदक विजेते आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दोन पदके जिंकवून देणाऱ्या स्टार नेमबाज मनू भाकर यांचे ते प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाने भारतीय नेमबाजी क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे

प्राथमिक माहितीनुसार, जसपाल राणा हे जर्मनीतील म्युनिक येथून भारतात परतत होते. विमान प्रवासादरम्यानच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. विमान दिल्ली विमानतळावर उतरताच, त्यांची बिघडलेली प्रकृती पाहून त्यांना तात्काळ साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला. जर्मनीतून परतल्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना वाचवण्यात अपयश आले.जसपाल राणा हे केवळ एक उत्कृष्ट प्रशिक्षकच नव्हते, तर ते स्वतः भारताचे एक उत्कृष्ट नेमबाज होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आशियाई खेळांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली होती. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून भारतीय नेमबाजांना घडवण्याचे मोलाचे काम केले. विशेषतः स्टार नेमबाज मनू भाकर हिच्या यशामागे जसपाल राणा यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या मनूने ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला होता.

वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी जसपाल राणा यांनी घेतलेल्या एक्झिटमुळे क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक दिग्गज खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय नेमबाजीतील एक मार्गदर्शक आणि गुरुवर्य हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles