यूट्यूबवर चोरीची कृती पाहून कारचालकाला लुटणारी टोळी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

यूट्यूबवर चोरीची कृती पाहून उबर लुटणारी टोळी जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई, 5.70 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहिल्यानगर, 17 जून 2026: झटपट श्रीमंत होण्यासाठी यूट्यूबवर चोरीची कृती पाहून उबर ॲपवरून गाडी बुक करून कारचालकाला लुटणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत तिघांना अटक करून पोलिसांनी 5 लाख 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

होटेल रिलॅक्सजवळ घडला प्रकार
दि. 13 जून 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता सुमारास ऑनलाइन उबर ॲपवरून वाकडेवाडी एस.टी. स्टँड, पुणे ते माळेवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर असे भाडे घेऊन निघालेले कारचालक विशाल सुर्यकांत कडू (रा. कोल्हेवाडी, सिंगद रोड, पुणे) यांना दि. 14 जून 2026 रोजी पहाटे 3:40 वाजता होटेल रिलॅक्स, खोसपुरी शिवार, ता. नगर येथे लघुशंकेकरिता गाडी थांबवली. त्यावेळी गाडीतील तीन इसमांनी चालकाचे डोळ्याला बंदूक लावून, हात बांधून, डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारून, बंदुकीचा धाक दाखवून, गाडीखाली ढकलून दिले. त्यानंतर गाडीतील रोख रक्कम, सोन्याची अंगठी व स्विफ्ट डिझायर गाडी असा एकूण 5,70,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून आरोपी पसार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जालन्याजवळ सापळा रचून अटक
पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि. हेमंत थोरात यांनी तपास पथक स्थापन केले. तांत्रिक विश्लेषण व व्यापक मोहीम राबवून हा गुन्हा 1) विशाल सोमनाथ तांगडे (वय 19, रा. आनंदवाडी, ता. गेवराई, जि. बीड) 2) तुळशीराम उर्फ राम पंढरीनाथ चव्हाण (वय 22) व 3) कल्याण उर्फ बबलू रामेश्वर गायकवाड (वय 19, दोघे रा. सदर) यांनी केल्याचे निष्पन्न झाले.

पथकाने आनंदवाडी येथे जाऊन नमूद आरोपींना पकडण्याकरिता सापळा रचला. पळून जाताना त्यांचा पाठलाग करून, कौशल्य पणास लावून शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी यूट्यूबवर पाहून उबर ॲपवरून गाडी बुक करून, स्वतःची ओळख लपवून, सिमकार्डचा खुबीने वापर करून, गाडीचा जी.पी.एस. काढून टाकल्याची कबुली दिली.

मुद्देमाल जप्त
आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेली स्विफ्ट डिझायर गाडी व गुन्हा करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. तिघांना अटक करून पुढील तपास पो.नि. हेमंत थोरात करत आहेत.

पथकाचे कौतुक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सो. सुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. हेमंत थोरात, पोउपनि मनोज मांढे, सफौ. राकेश खेडकर, पोहेकॉ शैलेश रोहकले, पोकॉ दिपक फुंदे, पोकॉ नवनाथ दहिफळे, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ राहुल गुंडू, पोकॉ अरुण सांगळे यांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles