राहाता विनयभंग प्रकरण: डॉ. सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द पूर्ण; आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर

डॉ. सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द केला पूर्ण; विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर

राहाता, दि. राहाता शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असताना पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका घेतलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण झाला आहे. प्रशासनाने संबंधित आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत कारवाई केली.

घटना घडल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर पोलीस, महसूल आणि नगरपालिकेच्या प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला.

या कारवाईमुळे राहाता शहरासह संपूर्ण तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्यापुढे झुकावेच लागेल, ही भूमिका या कारवाईतून अधोरेखित झाली आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी याप्रसंगी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पीडितेला न्याय मिळवून देणे आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. कायद्याच्या चौकटीत राहून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.”

दरम्यान, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून पीडित कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles