एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!

राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विविध विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे उपसभापती पदावर नेमकं कोणाची वर्णी लागणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लालेलं आहे. असं असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सचिन आहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या सहा खासदारांनी फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आठ दिवसांतच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना हा दुसरा मोठा धक्का दिला आहे.

राज्यात नुकत्याच ऑपरेशन टायगरने खळबळ उडाली होती. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक आमदार देखील शिंदे गटात येतील, असा दावा करण्यात येत होता. त्यातच आज ठाकरेंचं विधान परिषदमधील आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटाकडून उपसभापतीपदासाठी अर्ज भरल्याने ठाकरेंना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. सचिन अहिर यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन विधान परिषदेचे आमदार होते. त्यातील सचिन अहिर होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles