राजकारणातील अखेर सर्वात मोठा सस्पेन्स संपला! ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठी अपडेट….

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ‘ऑपरेशन टायगर’ चांगलंच चर्चेत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार फुटणार असल्याची चर्चा जोर धरू लागली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अजित पवार गटात अथवा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावरील खासदार फुटीचं मळभ तूर्तास दूर झाल्याची माहिती समोर आली आहे.
खासदार फुटीची टांगती तलवार राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षावरून तात्पुरती हटली आहे. पक्षात मोठे फेरबदल किंवा बंड होणार असल्याच्या चर्चांना सध्या पूर्णविराम मिळाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, पक्षाच्या अंतर्गत गोटात मात्र सध्या प्रचंड अस्वस्थता आणि मतप्रवाह असल्याचे उघड झाले आहे.मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, महाविकास आघाडीतील जागावाटप आणि भविष्यातील राजकीय गणितांवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांमध्ये दोन स्पष्ट गट पडले आहेत. यातील पहिल्या गटाची अशी ठाम भूमिका आहे की, पक्षाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि भाजपविरोधी लढाई मजबूत करण्यासाठी पक्षाने पूर्णपणे काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. या विलीनीकरणामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठी राजकीय ताकद निर्माण करता येईल, असा या गटाचा कयास आहे.

दुसरीकडे, पक्षातील दुसरा गट मात्र या विलीनीकरणाच्या पूर्णपणे विरोधात आहे. या गटाच्या मते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उभ्या केलेल्या या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखले पाहिजे. एवढेच नव्हे तर, बदलत्या राजकीय समीकरणांचा फायदा घेत पक्षाने थेट सत्ताधारी सरकारमध्ये सामील व्हावे, असाही एक मतप्रवाह या दुसऱ्या गटात जोर धरत आहे. सत्तेत सामील झाल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि पक्षाची पकड मजबूत होईल, असा युक्तिवाद या गटाकडून केला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles