केंद्र सरकारप्रमाणेच राज्यातील फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या काही अनुभवी नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते, असे एका खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांचे पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते असे सांगण्यात येतेय. त्याशिवाय पुण्यातील सुनल शेळकेंनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची शक्यता, खात्रीलयाक सूत्रांनी वर्तवली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेळके यांना सुद्धा मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार आणि अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवार यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.


