नगर शहरातील वेश्या व्यवसायावर एलसीबीचा छापा; दोन महिलांची सुटका

शहरातील वेश्या व्यवसायावर एलसीबीचा छापा; दोन महिलांची सुटका, एकीवर गुन्हा

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – शहरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संदीप दरवडे, विष्णू भागवत, योगेश भिंगारदिवे, विकास साळवे, सागर ससाणे व महिला अंमलदार भाग्यश्री भिटे यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती घेत होते.

दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी पथक कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, झिनत फैय्याजअली महंमद (वय ४४, रा. संजीवनी कॉलनी, पानसरेवाडा, रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर) ही तिच्या राहत्या घरात महिलांकडून कुंटणखाना (वेश्या व्यवसाय) चालविते.

माहितीच्या आधारे पथकाने पंचासमक्ष खात्री करण्यासाठी बनावट ग्राहक पाठविला. तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर छापा टाकून झिनत महंमद हिला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता दोन महिला मिळून आल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता झिनत हिने त्यांना वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे, ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातील काही रक्कम देऊन त्यांच्याकडून व्यवसाय करून घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

पथकाने दोन्ही पीडित महिलांची सुटका केली आहे.

आरोपी महिला झिनत फैय्याजअली महंमद ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कुंटणखाना चालवून त्यावर उपजीविका करत असल्याचे निष्पन्न झाल्याने तिच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८४५/२०२६ अन्वये स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles