अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 6 लाखांचा गुटखा व 22 लाखांच्या गाड्या जप्त

श्रीगोंद्यात अलिशान कारमधून गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 28.88 लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा/अहिल्यानगर, श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथे अलिशान कारमधून प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 28,88,330 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्याचे आदेश दिल्यानंतर, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि अनंत सालगुडे व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंग सुरू केले होते.

गुप्त माहितीच्या आधारे छापा
29/06/2026 रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, मुंढेकरवाडी येथे अमोल जाधव याने प्रतिबंधित गुटखा खरेदी करून विक्रीसाठी ठेवला असल्याचे समजले. पथकाने घराजवळ छापा टाकला असता तीन इसम पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये गोण्या भरताना आढळले.

ताब्यातील इसमांची नावे: 1) अमोल रामदास जाधव वय 35 रा. मुंढेकरवाडी, 2) अनिल रतन कुरुमकर वय 43 रा. मुंढेकरवाडी, 3) फरहान रेहमान बेपारी वय 23 रा. बुरुडगल्ली, ता. श्रीगोंदा.

22 लाखांच्या दोन गाड्या जप्त
चौकशीत अमोल जाधवने हा व्यवसाय दिपक लोखंडे रा. लोखंडेवाडी याच्यासोबत भागीदारीत चालवत असल्याचे सांगितले. सदरचा माल जत, जि. सांगली येथून अप्पु व माजीद यांच्याकडून खरेदी केल्याचे त्याने कबूल केले. फरहान बेपारी हा शोयेब तांबोळी यांच्या सांगण्यावरून माल विक्रीसाठी नेत होता.

आरोपींच्या ताब्यातून 6,03,200 रुपये किमतीचा आर.एम.डी, विमल पान मसाला व व्ही-1 सुगंधी तंबाखू, 22,00,000 रुपये किमतीच्या अल्कायझर व स्विफ्ट या दोन चारचाकी गाड्या, 30,130 रुपये रोख, 55,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल असा एकूण 28,88,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

3 आरोपी फरार
ताब्यातील आरोपींविरुद्ध पोकॉ मनोज साखरे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाणे गु.र.नं. 649/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3(5) सह अन्न सुरक्षा मानके 2006 चे कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक लोखंडे, अप्पु, माजीद व शोयेब तांबोळी हे 4 आरोपी फरार आहेत. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाणे करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles