अहिल्यानगर जिल्ह्यातील 1.92 लाख शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची माहिती पोर्टलवर अपलोड; 99.84% काम पूर्ण
अहिल्यानगर, 20 जून 2026: राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजने’ची अहिल्यानगर जिल्ह्यातील अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार 282 पात्र शेतकरी खातेदारांचा तपशील शासनाच्या पोर्टलवर अपलोड केला आहे.
सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने योजनेची पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी होऊन पात्र शेतकऱ्यांना तातडीने लाभ मिळावा यासाठी दिलेल्या निर्देशांनुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली.
99.84 टक्के डेटा अपलोड
दि. 28 जून 2026 अखेर बँकेने 99.84 टक्के पात्र कर्जदार खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. उर्वरित खात्यांची माहितीही लवकरच अपलोड करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
तालुकानिहाय पात्र खात्यांची संख्या
तालुकानिहाय अपलोड करण्यात आलेल्या पात्र खात्यांची संख्या पुढीलप्रमाणे:
अकोले – 10,478, जामखेड – 9,631, कर्जत – 12,305, कोपरगाव – 3,959, नगर – 9,425, नेवासा – 26,099, पारनेर – 9,488, पाथर्डी – 8,920, राहुरी – 16,347, राहता – 6,718, शेवगाव – 15,748, संगमनेर – 11,086, श्रीगोंदा – 41,383 आणि श्रीरामपूर – 10,695.
शासनाच्या या योजनेमुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमुक्त होऊन शेतीसाठी नवसंजीवनी मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांना लवकरच योजनेचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.


