विजयच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; पाठिंब्यासाठी व्हिसीकेची टीव्हीकेला मोठी अट

देशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्तास्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. टीव्हीके पक्षाला व्हीसीके पक्षाने आपला पाठिंबा दिल्याने विजय यांच्या पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) पक्षानेही टीव्हीकेचे विजय यांना पाठिंबा दिल्यामुळे आता विजय यांचे संख्याबळ 120 वर जाऊन पोहोचले आहे. तामिळनाडूत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 118 जागांची गरज असून टीव्हीके पक्षाकडे आता मॅजिक फिगरपेक्षा 2 आमदार जास्त आहेत.

तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्याच निवडणुकीत करिश्मा करुन दाखवला. विधानसभा निवडणुकीत तब्बल 108 जागा जिंकत टीव्हीके बहुमताच्या काठावर येऊन पोहोचली आहे. या यशाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थपलती विजय यांचे अभिनंदन केले. मात्र, सत्ता स्थापनेसाठी त्यांना 10 जागांचं संख्याबळ कमी पडत असल्याने काँग्रेससह इतर पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यातच, आता थोल थिरुमावलवन यांची पार्टी असलेल्या विदुथलाई चिरुथाइगल काची (व्हिसीके) पक्षानं थलपती विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. व्हिसीके पक्षाकडे 2 आमदार आहेत, या आमदारांसह विजय यांच्या पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला.
दरम्यान, व्हिसीके पक्षाने थपलती विजय यांच्यापुढे काही अटी ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. व्हिसीकेकडून पाठिंब्याच्या बदल्यामध्ये उपमुख्यमंत्रिपदासह काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हिसीके पक्ष उपमुख्यमंत्रिपदावर अडून बसला आहे, त्यामुळे, आता व्हिसीके पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळते का? ते पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.

अभिनेता विजय यांनी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला, परंतु त्यांच्याकडे केवळ 116 आमदारांची पाठिंब्याची पत्रे होती. यापूर्वी, विजय यांनी 6 आणि 7 मे रोजी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. तथापि, 118 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करता येणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles