onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -29-08–2026 एकुण कांदा गोणी -57,425
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 3800 ते 4250
2.नंबर= 2400 ते 3800
3 नंबर= 1500 ते 2400
4 नंबर= 700 ते 1500
————————————————————————————————————————————————–
नगर शहरात पाव-लादी महागणार ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू
वाढत्या महागाईमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून वाहतूक खर्च वाढला आहे. तसेच बेकरी व्यवसायाला लागणारा कच्चा माल तेल, साखर, मैदा यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील बेकरी व्यवसाय संकटात आला आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून बेकरी पदार्थमध्ये दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे.
शहरातील बेकरी व्यावसायिकांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पाव लादीचे दर 40 रुपये करण्याचा निर्णय बेकरी असोसिएशनने घेतला आहे. ही दरवाढ येत्या 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.यावेळी स्वराज बेकरीचे संचालक सलीम अन्सारी म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून बेकरी उत्पादनांचे दर कायम आहेत. परंतु महागाईचा भडका मोठ्या प्रमाणात वाढल्याने साखर, तेल, मैदा यांचे दर वाढले आहेत. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्याने बेकरी व्यावसायिक संकटात आले आहेत. शहरातील बेकरी व्यावसायिकांनी एकत्र येऊन दरवाढ करण्याचे ठरवले आहे.
उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन पाव लादी होलसेल 40 रुपये आणि रिटेलसाठी 50 रुपये दराने ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाणार आहे.जेके बेकरीचे संचालक पारितोष शिंदे म्हणाले, बेकरी उत्पादनांची दरवाढ नाशिक, पुणे, बारामती अशा शहरांमध्ये यापूर्वीच करण्यात आली असून नगर शहरातही 1 सप्टेंबरपासून ही दरवाढ लागू करण्यात येत आहे. याची सर्व ग्राहकांनी नोंद घ्यावी.या बैठकीस स्वराज बेकरीचे सलीम अन्सारी, जेके बेकरीचे पारितोष शिंदे, सहारा बेकरीचे सलमान मलिक, फैजा बेकरीचे सादाब शेख, फाईव्ह स्टार बेकरीचे अन्सार अन्सारी, मिलन बेकरीचे सलीम शेख, फैसल शेख, जिशान अन्सारी, सादाब अन्सारी, मुमताज शेख आदी बेकरी व्यावसायिक उपस्थित होते.


