onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव
अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव
दिनांक -31-08–2026 एकुण कांदा गोणी -50,542
गावरान कांदा बाजार भाव
1 नंबर= 4000 ते 4600
2.नंबर= 3000 ते 4000
3 नंबर= 1900 ते 3000
4 नंबर= 900 ते 1900
————————————————————————————————————————————————–
मेहकरी शिवारातून विहिरीसह बोअरवेलच्या विद्युत तारांची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहकरी गावच्या शिवारात शेतातील विहिरी आणि बोअरवेलच्या पंपांच्या कॉपरच्या विद्युत तारा चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहकरी येथील रहिवासी व निवृत्त कर्मचारी बाबासाहेब हरी सानप (वय ७०) यांच्यासह त्यांचे शेजारी अशोक सानप आणि भास्कर सानप यांच्या शेतातील विहिरी व बोअरवेलवरील पाण्याच्या पंपांना जोडलेल्या कॉपरच्या तारा अज्ञात चोरट्याने रात्रीच्या सुमारास कापून नेल्या. दिनांक २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते ३० ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान ही चोरी झाली. यामध्ये सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या २५० फूट लांबीच्या कॉपर तारांची चोरी झाली आहे.सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आला. त्यानंतर बाबासाहेब सानप यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार लाड हे करत आहेत.


