onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

onion price today…आज कांद्याला काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव

अहिल्यानगर बाजार समिती आजचे बाजार भाव

दिनांक -10-09–2026 एकुण कांदा गोणी -64,302
गावरान कांदा बाजार भाव

1 नंबर= 4000 ते 4700
2.नंबर= 2600 ते 4000
3 नंबर= 1700 ते 2600

4 नंबर= 700 ते 1700

————————————————————————————————————————————————–
पाथर्डी-शेवगावमध्ये दुष्काळ जाहीर करा : आ. मोनिका राजळेंची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
पावसाअभावी पाथर्डी-शेवगाव तालुक्यात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि शेतीपिकांचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून, या पार्श्वभूमीवर आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाथर्डी-शेवगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात यंदा अत्यल्प पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पेरणीनंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने बहुतांश पिके जळून गेली आहेत. फळबागांनाही पाण्याअभावी मोठा फटका बसत आहे. त्याचबरोबर जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मतदारसंघातील अनेक गावांमध्ये मे 2026 पासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या 53 गावांतील 281 वाड्या-वस्त्यांना 65 टँकरद्वारे 121 खेपा करण्यात येत आहेत.

आगामी काळात मोठा पाऊस न झाल्यास टँकरची संख्या आणि खेपांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज आहे. तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात किंवा चारा व पाण्यासाठी शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही आमदार राजळे यांनी केली.या सर्व परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना देऊन आमदार राजळे यांनी निवेदन सादर केले. पाथर्डी-शेवगावमध्ये दुष्काळ जाहीर करून पिण्याचे पाणी, चारा, शेतीपिकांचे नुकसान आणि जनावरांच्या प्रश्नावर शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles