४ लाख रुपयांसाठी सासरच्या लोकांचा तगादा; छळाला कंटाळून अहिल्यानगरमध्ये २३ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

अहिल्यानगर- राहाता येथे धक्कादायक घटना आहे. एका विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून या महिलेने स्वतः जीव दिला आहे. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठीय या महिलेचा छळ केला. या त्रासालाच कंटाळून तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. राहता तालुक्यातील एकरुखे येथे ही घटना घडला आहे. प्रिया शुभम ढगे असं या विवाहित महिलेचं नाव आहे. २३ वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून जीव दिला आहे.

विवाहित महिलेकडे माहेरुन हुंडा आणण्याची मागणी केली जात होती. सासरच्यांनी तिला पैसे आणायला सांगितले होते. घराच्या बांधकामासाठी चार लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न आणल्याने सासरच्यांकडून विवाहितेचा छळ करण्यात आला. याच जाचाला कंटाळून तिने आपलं आयुष्य संपवलं. पती शुभम ढगे, सासरा राजेंद्र ढगे आणि सासू प्रतिभा ढगे यांच्याविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

२०२४ ते २०२६ या कालावधीत प्रियाच्या सासरच्यांनी तिला त्रास दिला. तिचा मानसिक अन् शारीरिक छळ सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. सासरच्यांचा छळ सहन न झाल्याने प्रियाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles