अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली…
अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची मुंबईला बदली.
त्यांच्या जागी चंद्रपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती.
राज्यातील २१ आय पी एस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. नगरचे एस पी. घार्गे यांची अल्प काळातच बदली झाली आहे. त्यांची नियुक्ती मुंबईला पोलिस महासंचालक कार्यालयात सहायक पोलिस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे. गेल्याच वर्षी ते नगरला आले होते.
सुदर्शन मूळचे तेलगण राज्यातील आहेत. मुम्मका सुदर्शन हे २०२३ बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत. सुदर्शन यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला.
यापूर्वी त्यांनी पुणे येथे पोलीस उपायुक्त (DCP) म्हणून काम केले आहे. तिथे त्यांनी वाहतूक विभाग आणि परिमंडळ ४ मध्ये आपली सेवा दिली होती. त्यांची ओळख एक शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी काही विशेष क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले होते. जिल्ह्यातील कोळसा तस्करी, अवैध दारू विक्री आणि इतर गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी कडक पावले उचलली. पोलीस आणि नागरिक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी ते विविध उपक्रम राबवण्यावर भर देतात.
नगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; त्यांच्या जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती
- Advertisement -


