वीज कंपनीच्या शटडाउनमुळे अहिल्यानगरचा पाणी पुरवठा विस्कळीत; 3 दिवस रोटेशन उशिरा

वीज कंपनीच्या शटडाउनमुळे 23 मे रोजी अहिल्यानगरचा पाणी पुरवठा विस्कळीत, 3 दिवस रोटेशन उशिरा

अहिल्यानगर, 22 मे 2026: महावितरण कंपनीकडून 33 केव्ही मुळा डॅम वाहिनीची पावसाळ्यापूर्व देखभाल-दुरुस्ती व एचटी ग्राहकांचे पीटी बदलण्याचे काम शुक्रवार, दि. 23 मे 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हाती घेण्यात आले आहे. यासाठी वीज कंपनीने शटडाउन घेतला आहे.

याच कालावधीत महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामेही करण्यात येणार आहेत. दरम्यान मुळानगर व विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाहीत, असे मनपा प्रशासनाने कळविले आहे.

पाणी पुरवठ्यावर परिणाम असा होणार:

1. शनिवार, 23 मे 2026: बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सुर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर, सारसनगर, बुरूडगाव रोड, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसर आदी भागात पाणी पुरवठा होणार नाही. हा पुरवठा रविवार, 24 मे रोजी केला जाईल.

2. रविवार, 24 मे 2026: रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच सिध्दार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नाही. या भागातील पाणी पुरवठा सोमवार, 25 मे रोजी केला जाईल.

3. सोमवार, 25 मे 2026: मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, धरती चौक, बंगाल चौकी, कोठी या भागासह गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हाडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हाडको, स्टेशन रोड, आगरकर मळा, विनायक नगर इत्यादी भागात पाणी पुरवठा होणार नसून तो मंगळवार, 26 मे रोजी केला जाईल.

शहरातील पाणी पुरवठा एक दिवस बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसांचे रोटेशन आलेले आहे अशा भागात पाणी पुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.

तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles