पैसे मागणीची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल;पारनेरचे निरीक्षक खेडकर नियंत्रण कक्षात

पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी वाळू चोरीच्या प्रकरणात फिर्यादीतून नाव वगळण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप असलेली कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी खेडकर यांची नियंत्रण कक्षात बदली केली असून पोलीस उपअधीक्षक (अहिल्यानगर ग्रामीण) यांच्यामार्फत चौकशी सुरू केली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्याकडे पारनेर पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. नागापूरवाडी येथील मांडवा शिवारातील मुळा नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळूचोरी केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीचे नाव फिर्यादीत न टाकण्याच्या हमीवर दोन लाख रूपये देण्याबाबतचा कथित संवाद या ध्वनिफितीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी एक लाख रूपये यापूर्वी दिल्याचे आणि उर्वरित एक लाख रूपये जमा करण्याबाबत संवाद झाल्याचाही उल्लेख त्यामध्ये असल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, खेडकर यांनी ही ध्वनिफीत संपादित व मिश्रित असल्याचा दावा केला आहे. आपण कोणाकडेही पैशांची मागणी केलेली नाही. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या ध्वनिफितीतील संभाषणात फेरफार करण्यात आला असून, सत्य चौकशीत समोर येईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, चौकशी सुरू झाल्याने खेडकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. सध्या दिवटे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles