Tuesday, November 11, 2025

मनोज जरांगेंच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतरही ठाकरे मराठा आंदोलकांच्या मदतीला; म्हणाले,

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत आहेत. यादरम्यान हजारो मराठा बांधव देखील मुंबईत तळ ठोकून आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून, सुरूवातीचे काही दिवस त्यांची गैरसौय झाल्याचे दिसून आले होते. यादरम्यान आता मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मनसे कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांची मदत करावी असे आवाहन केले आहे.

अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुंबईत आलेले सर्व आपले बांधव आहेत आणि ते घरापासून दूर आंदोलन करत आहेत त्यांना काही कमी पडू नये ही जबाबदारी आपली आहे, असे मनसे कार्यकर्त्यांना सांगितले आहे.तसेच त्यांनी गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी, औषधोपचार आणि राहण्याची सोय पुरवली जावी असेही अमित ठाकरे म्हणाले आहेत.

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,
सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत.
हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत.
ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे.
माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे,

जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा.
औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका.
त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे.
लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत.
आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल.
आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे.
जय महाराष्ट्र!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles