IAS अधिकारी म्हटले की त्यांचा तामझाम, त्यांच्या कडील अधिकार, त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा याची चर्चा होते. प्रत्येक तरुणाला, तरूणींना IAS अधिकारी व्हायचे असते. मात्र कर्तव्य बजावताना या सनदी अधिकाऱ्यांना अनेक आव्हाने पेलावी लागतात. थेट जनतेशी समरस होणारे अधिकारी लोकप्रिय होतात. असेच एक उदाहरण म्हणजे अमरावती जिल्हा परिषदेच्या सीईओ संजिता महापात्रा. नुकतीच महापात्रा यांची प्रशासकीय बदली झाली. त्यांच्या निरोप समारंंभात कर्मचारीही भावनिक झाले होते.
यावेळी बोलताना महापात्रा यांनी आपल्याला जिल्हा परिषदेत जे चांगले काम करता आले त्याचे श्रेय आपल्या स्टाफला दिले. त्या म्हणाल्या की, साधारण महिला कर्मचाऱ्यांना आपले काम सांभाळून घरातील कामेही करावी लागतात. पण माझ्या कडे स्टाफ होता. घरी काम करणारे काका माझ्या लहान बाळाची खूप काळजी घ्यायचे. मी ट्रीप वरून आल्यावर माझं बाळ त्या काकांकडे धावत गेला. इतका लळा त्याला लागला होता. ड्रायव्हर, अंगरक्षक आणि शिपाई अशा सर्वांचेच त्यांनी आभार मानले. इतक्या मोठ्या अधिकाऱ्याच्या या प्रांजळ भावना सर्वांना भावनिक करणाऱ्या ठरल्या…
व् एखादा मोठा अधिकारी आपल्या यशाचे श्रेय आपल्या घरी काम करणारे, तेव्हा ते नेतृत्व खऱ्या अर्थाने महान ठरतं! संजिता महापात्रा मॅडम यांचा अमरावती जिल्हा परिषदेतील निरोप सोहळा केवळ प्रशासकीय नव्हता, तर तो नात्यांचा सोहळा होता….!!!


