तीन तरूणांचे महिलेसोबत अश्‍लिल वर्तन; नगर शहरातील घटना….

अहिल्यानगर -शहरातील स्वास्तिक चौक परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत तीन तरूणांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने (वय 40) यासंदर्भात गुरूवारी (16 एप्रिल) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

अजिंक्य रक्ताटे, प्राजक्त शेरकर व ज्ञानेश्‍वर (पूर्ण नावे माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या कुटुंबासह स्वास्तिक चौक भागातील एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे. अपार्टमेंटमध्ये पाणी येत नसल्याने त्यांना पाणी भरण्यासाठी खाली यावे लागते. 10 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जेव्हा पीडिता पाणी भरण्यासाठी खाली आली होती, तेव्हा संशयित आरोपींनी अश्‍लिल वर्तन केले.

संबंधित तरूणांनी पीडितेकडे पाहून अश्‍लिल हावभाव केले आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. जेव्हा पीडितेने या कृत्याचा जाब विचारला, तेव्हा संशयितांनी पीडितेचा हात धरून त्यांना धमकावले. पीडितेने पतीला माहिती दिली. त्यांनी जाब विचारला असता आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की केली आणि ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, या घटनेनंतर पीडितेने 16 एप्रिल रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द विनयभंग आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles