Video:अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याची एकच चर्चा; बॉलीवूडच्या प्रसिद्ध संगीतकारांनं दिलंय संगीत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम त्यांच्या नव्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. सध्या त्यांच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचा टिझर नुकताच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘ नमन तुला ‘ असे गाण्याचे बोल असून एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिना दिवशी हे गाणं प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. छत्रपती शिवरायांना या गाण्यातून आदरांजली वाहण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे.1 मे रोजी राज्यात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची सध्या एकच चर्चा आहे.’ नमन तुला’ या गाण्याचा टिझर नुकताच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. .सध्या राज्यभरात मनोरंजन सृष्टीत चर्चा आहे राजा शिवाजी या चित्रपटाची. महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या शौर्यात महाराष्ट्र दंग झालेला असताना अमृता फडणवीस यांच्या ‘नमन तुला ‘ हे गाणं रिलीज होणार आहे. जिथे मातीमध्ये ही शौर्य आहे ..तिथेच उभा आहे आमचा राजा नमन तुला ..असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं टी सिरीज यांनी प्रस्तुत केलं असून या गाण्याचे संगीतकार अनु मलिक आहेत. तसेच या गाण्याचे कुलकर्णी आणि शक्ती हसी जा यांचाही सहभाग आहे . दरम्यान अमृता फडणवीस यांनी नमन तुला या गाण्याचे पहिली झलक चाहत्यांसाठी शेअर केली आहे. हे गाणं एक मे रोजी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.


अमृता फडणवीस यांनी 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रि निमित्त ‘शंभु रे ‘ हे गाणं प्रदर्शित केलं होतं. महादेवाला समर्पित असलेलं हे भजन आल्यानंतर ‘किसी की मुस्कुराहटो पे ‘ हे गाणं जानेवारी 2026 मध्ये त्यांनी रिलीज केलं. अमृता फडणवीस यांना पहिल्यापासून गाण्याचे आवड होती .त्यांनी ॲक्सिस बँक मधील नोकरी सांभाळ त्यांच्या आवड जपली.आता पूर्ण वेळ त्या गाण्याकडे वळल्या आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles