Wednesday, November 12, 2025

Railway Recruitment:रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ६२३८ पदांसाठी भरती सुरु

रेल्वेत १०वी पास आणि आयटीआय उमेदवारांसाठी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने टेक्निशियन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. तुम्ही rrbapply.gov.in या वेबसाइटवर जाऊन इतर माहिती मिळवू शकतात. रेल्वेतील ही भरती ६२३८ पदांसाठी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२५ आहे. तुम्ही ३० जुलैपर्यंत अर्जाची फी भरु शकतात. जर तुम्हाला फॉर्म एडिट करायचे असेल तर १० ऑगस्टपर्यंत करु शकतात.

रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, रेल्वे टेक्निशियन भरती मोहिमेत टेक्निशियन ग्रेड १ सिग्नल पदासाठी १८३ रिक्त जागा आहेत. टेक्निशियन ग्रेड III पदासाठी ६०५५ रिक्त जागा आहेत.टेक्निशियन ग्रेड III २१०६ पदे रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या नोकरीसाठी उमेदवारांनी इंजिनियरिंगमध्ये बीई/बी.टेक, इंजिनियरिंग डिप्लोमा किंवा बी.एससी पदवी प्राप्त केलेली असावी. टेक्निशियन ग्रेड III पदासाठी उमेदवारांनी आयटीआय प्रमाणपत्र आणि १०वी पास असणे गरजेचे आहे किंवा पीसीएम विषयात १२वी पास असणे गरजेचे आहे.

टेक्निशियन ग्रेड I पदासाठी १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. टेक्निशियन ग्रेड III पदासाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

टेक्निशियन ग्रेड I पदासाठी २९,२०० रुपये पगार मिळणार आहे. टेक्निशियन ग्रेड III पदासाठी लेव्हल २ नुसार १९,९०० रुपये पगार मिळणार आहे.तुम्ही rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.

यानंतर CEN No. 02/2025 – टेक्नीशियन भरती 2025 यावर क्लिक करा.

यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि अॅप्लिकेशन फॉर्म भरा.

यानंतर कागदपत्रे अपलोड करा आणि अॅप्लिकेशन फी भरा.

यानंतर फॉर्म सबमिट करा आणि डाउनलोड करा.

Related Articles

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles