Wednesday, November 12, 2025

कलाशिक्षक शिवानंद भांगरे यांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मान

शिवानंद भांगरे यांचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मान
पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव
नगर (प्रतिनिधी)- जानकीबाई आपटे मूक बधिर विद्यालयातील कलाशिक्षक शिवानंद भांगरे यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पर्यावरण मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथे आषाढी एकादशी व राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात भांगरे यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा तथा साहित्यिक गुंफाताई कोकाटे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, कवी संमेलनाच्या अध्यक्षा मनिषा गायकवाड, कवियत्री सरोज अल्हाट, संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, कवी आनंदा साळवे, संभाजी नगर जिल्हा परिषदचे माजी सभापती मारुती साळवे, दिलावर शेख, साहेबराव बोडखे, भाऊसाहेब ठाणगे, विस्तार अधिकारी नलिनी भुजबळ, रामदास फुले आदी उपस्थित होते.
शिवानंद भांगरे यांचे पर्यावरण संवर्धन, कला, सांस्कृतिक व सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यरत आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पर्यावरण मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल आदिवासी सामाजिक बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे, ज्ञानदेव मुकणे, चित्रकार कविराज बोटे, हिरामण पोपेरे, दिनकर भांगरे, भाऊराव नाडेकर, भरत साबळे, रामनाथ कचरे, सुधा धिंदळे, उद्योजक संतोष दसासे, जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles