नाशिकमध्ये SIT कडून रुपाली चाकणकरांची कसून चौकशी; अशोक खरात प्रकरणावर दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

भोंदू अशोक खरात प्रकरणातमहिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची गेल्या दोन तासांपासून नाशिकमध्ये एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. आज (रविवारी) सकाळीच चाकणकर एसआयटीच्या चौकशीसाठी पुण्याहून नाशिकमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी थेट एसआयटीच्या कार्यालयात हजेरी लावली. त्याठिकाणी एसआयटीप्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

या चौकशीत रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता या चौकशीत अशोक खरात प्रकरणात आणखी कोणती नवी माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे झाले असून, पोलिसांनी यापूर्वीच अनेक जणांची चौकशी केली आहे. खरातला सध्या २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, एसआयटी जो तपास करत आहे, त्या संदर्भात पोलिसांना काही उत्तरे हवी आहेत. तपासाला माझे पूर्ण सहकार्य राहील. जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरे तपास पूर्ण झाल्यावर सर्वांना मिळतील,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसेच अशोक खरात याच्याशी संबधित आरोपावर उत्तर देतांना म्हटले होते की, “मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनात आहेत. ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल. त्या तपासातूनच तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळतील” असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
यावेळी बोलतांना रुपाली चाकणकर यांनी समता आणि जगदंबा पतसंस्थेतील सर्व खाती बनावट असल्याचा दावा केला. त्या म्हणाल्या की, “ती सर्व खाती बनावट आहेत आणि त्याचा अधिकृत अहवाल लवकरच समोर येईल,” असे चाकणकर यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles