थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा

अभिनेते-राजकारणी सी. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही उपस्थित होते. मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत इतर नऊ मंत्र्यांनीही शपथ घेतली. यामध्ये एन. आनंद, आधव अर्जुन, डॉ. के. जी. अरुणराज, के. ए. सेंगोत्तैयन, पी. व्यंकटरमणन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि सेल्वी एस. कीर्तना यांचा समावेश आहे. हे सर्व विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे आमदार आहेत. मित्रपक्षांच्या कोणत्याही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. सरकार स्थापन करण्यासाठी आपल्या पक्षाला पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री विजय यांनी काँग्रेस, व्हीसीके आणि डाव्या पक्षांचे आभार मानले.यामध्ये 200 युनिट मोफत वीज पुरवठा, महिला सुरक्षा दलाची स्थापना आणि अमली पदार्थ विरोधी पथकाच्या स्थापनेच्या आदेशांचा समावेश आहे.दरम्यान, विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल क्लिपची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. विजय यांनी शपथ घेताच भाषण दिले. ते म्हणाले, ही एक नवीन सुरुवात आहे. खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाच्या एका नवीन युगाची आता सुरुवात होत आहे. त्यांच्या या वाक्याची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. विजय यांच्या भाषणातील 5 मुद्दे
पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आम्ही राज्याच्या आर्थिक स्थितीवर ‘श्वेतपत्र’ जारी करू.
आमचे काम सिद्ध करण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ द्या.
ड्रग्जविरोधात कठोर कारवाई केली जाईल. जनतेच्या पैशाला हात लावला जाणार नाही.
विजय यांच्याशिवाय सत्तेचे दुसरे कोणतेही केंद्र नसेल; विजय हेच सत्तेचे एकमेव केंद्र असतील.
खऱ्या, धर्मनिरपेक्ष आणि सामाजिक न्यायाच्या एका नवीन युगाची आता सुरुवात होत आहे.
https://x.com/Shailendraydv61/status/2053396180491554984?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2053396180491554984%7Ctwgr%5Eca80c42e3f7a0722ca9ed89bd0090a561a58ec70%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Felections%2Fthalapathi-vijay-most-viral-and-powerful-speech-this-is-a-new-beginning-new-era-of-real-secular-social-justice-starts-now-marathi-news-update-1423522

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles