भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्याच्या स्वागत अध्यक्षपद आ. संग्राम जगताप यांनी स्वीकारावे – पुतळा उभारणी समितीची निवेदनाद्वारे मागणी
अहिल्यानगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आ. संग्राम जगताप यांचे मोठे योगदान आहे त्यांनी पुतळा उभारणी समितीला सहकार्य करत येणाऱ्या अडचणीवर तोडगा काढत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, पुतळा उभारणी कामाचा लोकार्पण सोहळा दिनांक 27 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे तरी आपण या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा उभारणी समितीच्या वतीने निवेदनाद्वारे आ. संग्राम जगताप यांच्याकडे केली. यावेळी सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, जलअभियंता परिमल निकम, विजय भांबळ, विलास साठे, विनीत कसबेकर, सुनील क्षेत्रे, संजय जगताप, सुहास शिरसाट, विशाल भिंगारदिवे, विशाल वाकडे, संजय जगताप, पोपट जाधव, लखन सरोदे, मन्या भाऊ अल्हाट, किरण दाभाडे, कौशल गायकवाड, सुदाम सरोदे, भाऊसाहेब साठे आदी उपस्थित होते.


