खासदार सुप्रिया सुळेंचा सर्वात मोठा निर्णय, बारामतीतून लढणार नाही, कारण ?

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पवार कुटुंबाशी संबंधित ही बातमी आहे. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी दुसऱ्या मतदारसंघातून लढेन. पण बारामतीत कुटुंबाच्या विरोधात नकोच, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांनीही त्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मनातील भावना बोलून दाखवल्या होत्या. मी यापुढे पवार कुटुंबीयांच्या विरोधात कधीही निवडणूक लढणार नाही. मागच्यावेळीही माझी बारामतीतून लढण्याची इच्छा नव्हती. पण त्यावेळी कारणं वेगळी होती. आता मात्र, मी कुटुंबातील कोणत्याही सदस्याविरोधात लढणार नाही. मी दुसरा मतदारसंघ बघणार आहे. कुटुंबातील दुसऱ्या कुणाला बारामतीतून लढायचं असेल तर त्यांनी लढावं, मी मात्र, लढणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

तसेच पवार कुटुंबीय कालही एक होतं. आजही एक आहे. त्यामुळे 2029मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत, असं सांगत सुप्रिया सुळे यांनी 2029मध्ये पवार विरुद्ध पवार अशी कोणतीही लढत होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांनीही घेतलेली सकारात्मक भूमिका आहे. कुठल्याही कुटुंबामध्ये वाद असू नये, अशी माझी भूमिका आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी अशी सर्व राष्ट्रवादी पवार कुटुंबीयांची आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रियाताई सुळे करत आहेत. सुप्रिया सुळे या संवेदनशील आहेत. कुठेही कुटुंब राजकारणामुळे दुभंगू नये, अशी माझी वैयक्तिक भावना आहे, असं उदय सामंत म्हणाले.

“खासदार सुप्रिया सुळे यांनी यापुढे बारामतीतून लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की, “चांगली गोष्ट आहे. स्वागत आहे त्यांचं. त्याच्यात काहीही वाईट नाही. त्यांनी एक रोड मॅप आखून दिला आहे. पवार विरुद्ध पवार कुटुंबियांनी लढायचं नाही. चांगली गोष्ट आहे” असं छगन भुजबळ म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles