पंजाब विधानसभेत मोठा राजकीय वाद
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप
शिरोमणी अकाली दलाकडून व्हिडिओ जारी
राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री दारू पिऊन विधानसभेत पोहोचले आणि भाषण देऊ लागल्याचा आरोप विरोधी पक्ष शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) केला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान हे विधानसभेत दारू पिऊन आल्याचा गंभीर आरोप शिरोमणी दलाने केला आहे. दरम्यान पंजाबमधील विरोधी पक्ष, शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) मुख्यमंत्री भगवंत मान यांचा दारू प्यायलेला एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.
अकाली दलाने ट्विटर पोस्ट करताना लिहिले की,”ही शरमेची बाब आहे की भगवंत मान आज कामगार दिनानिमित्त दारू पिऊन विधानसभेच्या पवित्र सभागृहात पोहोचले.” तुम्ही स्वत: मुख्यमंत्र्याची स्थिती पाहून घ्या.विधानसभेत कशाप्रकारे ते वागतात. मुख्यमंत्र्यांच्या अशा वागण्याचा आम्ही निषेध करतो. आजच्या दिवशीतरी शराब पिऊन विधानसभेत जायला पाहिजे नव्हतं. मुख्यमंत्र्यांची डोप टेस्ट केली जावी, जेणेकरून खरी बाब समोर येईल.
पंजाबचे विरोधीपक्ष नेते प्रताप सिंह बाजवा यांनी सर्व आमदाराची अल्कोहोल चाचणी केली पाहिजे. काँग्रेसच्या एका आमदाराने आरोप केला की, पंजाबचे मुख्यमंत्री दारू पिऊन विधानसभेत आले. त्यामुळे सर्व आमदारांची अल्कोहोल मीटर चाचणी झाली पाहिजे. “राष्ट्रप्रमुखांवर” गंभीर आरोप झाल्यामुळे सत्यता पडताळण्यासाठी प्रत्येक आमदाराची चाचणी झालीच पाहिजे.
https://x.com/Akali_Dal_/status/2050102148432888193?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2050102148432888193%7Ctwgr%5Eeb64f51af0f63cac300e61eaed8382ac04c18b9b%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fnational-international%2Fpunjab-politics-in-turmoil-sad-targets-cm-bhagwant-mann-over-shocking-claims-opposition-alleges-mann-attend-assembly-consumed-alcohol-bbj88
पंजाब विधानसभेतील गदारोळावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, हे विशेष अधिवेशन ‘कामगार दिना’ला समर्पित आहे. त्यांनी सर्व सदस्यांना वाद टाळून सभागृहाची प्रतिष्ठा जपण्याचे आवाहन केलं. कामगार दिनानिमित्त राज्यातील ‘आप’ सरकारने १ मे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. सरकार “आपल्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात आणि कमकुवत अवस्थेत” असताना या विशेष अधिवेशनाचा कामगारांना कसा फायदा होईल, असा प्रश्न काँग्रेस नेते वॉरिंग यांनी उपस्थित केला.


