अहिल्यानगर दिनांक 25 प्रतिनिधी
अहिल्यानगर महापालिकेतील रस्त्यांच्या कामातील ४०० कोटींचा घोटाळा उघडकीस आणून भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांचा पर्दाफाश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी केला. या यानंतर काळे यांच्यावर सुडाणे कारवाई करत त्यांना अटक केली होती. आज येथील सहदिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती डी. के. पाटील यांनी न्यायालयीन कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान दुपारी काळे यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी जामीन मिळण्यासाठी काळे यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला.
या घटनेनंतर किरण काळे यांच्या व खोटा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता . त्यांना पोलिसांनी पहाटेच दि 22 रोजी 3 वाजता अटक करण्यात आली. दिनांक 22 रोजी त्यांना येथील न्यायालयामध्ये हजर केले होते. काळे यांचे वतीने ज्येष्ठविधीज्ञ पुप्पाल यांनी न्यायालयामध्ये भक्कमपणे बसू मांडत दोन वर्षानंतर म्हणजे 730 दिवसानंतर सदरचा गुन्हा दाखल झाला आहे स्कॉटलंड पेक्षाही अधिक वेगाने पोलिसांनी याचा तपास करून काळे यांना तात्काळ पहाटे अटक केली. यासह विविध प्रकारचे मुद्दे त्यांनी युक्तीवादामध्ये न्यायालयामध्ये केले हा खोटा गुन्हा असून राजकीय वैमान्यातून त्यांना गोवले गेले आहे, असे त्यांनी युक्तिवादामध्ये म्हणले होते.
अॅड. पुप्पाल यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, काळे यांनी गेल्या दोन वर्षांपासून अहिल्यानगर महानगरपालिकेतील 400 कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता. खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले होते. काळे यांनी या घोटाळ्याबाबत राज्यपालासह विविध अधिकाऱ्यांना सुमारे 24 निवेदने सादर केली होती.
काळे काँग्रेसमध्ये कार्यरत असताना घटना घडल्याचा आरोप आहे, मात्र आता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख आहेत. त्यामुळे ही कारवाई म्हणजे राजकीय सूडभावना असून, संबंधित महिलेने कर्जतहून (70 किमी अंतर) अहिल्यानगरमध्ये येण्यासाठी दोन वर्षे लावली, ही बाब संशयास्पद आहे, असा मुद्दा अॅड. पुप्पाल यांनी मांडला.
यानंतर न्यायालयाने दोन्ही बाजूस युक्तिवाद आल्यानंतर काळे यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर काळे यांना आज येथील न्यायालयामध्ये हजर केले असता तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी थोरात यांनी न्यायालयीन कोठडी मिळावी असा रिमांड रिपोर्ट न्यायालयामध्ये दाखल केला होता.
यानंतर काळे यांना जामीन मिळावा याकरता येथील जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. यानंतर येथील जिल्हा न्यायाधीश के. एस.कुलकर्णी यांनी सरकार पक्षाला व फिर्यादी यांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत या खटल्याची पुढील सुनावणी दिनांक 29 रोजी ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले आहे.


