बारामती-राहुरीत मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करणार, भाजपच्या ४० स्टार प्रचारकांची यादी

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामती आणि राहुरीत अनेकांनी अर्ज माघारी घेतले. पण काही जण निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले. त्यामुळे आजपासूनच प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात झाली आहे. पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाच्या केंद्रीय कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी निवडणूक आयुक्तांना सादर करण्यात आली आहे.

बारामती आणि राहुरीत प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, नितीन गडकरी, शिव प्रकाश, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे पाटील, प्रा. राम शिंदे, ॲड. आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, गणेश नाईक, उदयन राजे भोसले, जयकुमार रावल, शिवेंद्र राजे भोसले, नितेश राणे, जयकुमार गोरे, अतुल सावे, मेघना बोर्डीकर, अशोक उईके, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, डॉ. भागवत कराड, गोपीचंद पडळकर, डॉ. संजय कुटे, धनंजय महाडिक, मायाताई इवनाते, भारती पवार, रामराव वडकुते, डॉ. सुजय विखे पाटील, योगश टिळेकर, अमित गोरखे, मोनिका राजळे, राहुल कुल आणि इद्रीस मुलतानी या नेत्यांचा समावेश आहे

राहुरी मतदारसंघातील पोट निवडणुकीसाठी अखेर सात उमेदवार रिंगणात उरले आहेत. ३० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज माघारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत २३ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता प्रमुख दोन उमेदवारासह सात उमेदवार रिंगणात उरले आहेत. अक्षय शिवाजी कर्डिले (भाजप), गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यासह संतोष एकनाथ चोळके ( वंचित बहुजन आघाडी), रावसाहेब सदाराम खेवरे, महेश केशव हापसे, सुरेश दत्तात्रय लांबे आणि अथर्व साहेबराव म्हसे (सर्व अपक्ष) हे उमेदवार रिंगणात उरले आहेत.

बारामती पोटनिवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतली. सुनेत्रा पवार यांच्यासह आता २३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. बारामती पोट निवडणुकीसाठी ५५ उमेदवारांनी ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण शेवटच्या दिवशी अनेकांनी अर्ज माघारी घेतला. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीची पोट निवडणूक होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles