पार्टी विथ डिफरन्समुळेच भाजप ग्रेट पक्ष : प्रा. राम शिंदे

पार्टी विथ डिफरन्स या विच्रारावर काम होत असल्याने भाजप हा ग्रेटच पक्ष : सभापती प्रा.राम शिंदे

भाजपची जिल्हा पदाधिकारी बैठक शहरात संपन्न

अहिल्यानगर – भारतीय जनता पार्टीही संघटनात्मक ढाच्यावर भक्कमपणे उभी आहे. पक्षाचा डीएनए हा प्रखर विरोधकाचा असला तरी आता सत्ताधारी असा दोन्ही प्रकारचा आहे. पार्टी विथ डिफरन्स या विच्रारावर काम होत असल्याने भाजप हा ग्रेटच पक्ष आहे. त्यामुळेच गेल्या १७ वर्षांपासून देशात सत्ताधारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या योग्य कामामुळे भाजपला हे चांगले दिवस आले आहेत. त्यांच्या कार्याचा अभिनंदनचा ठराव मांडून तो सर्वांनी मंजूर करावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी करून भविष्यात जिल्हा परिषद, नगरपंचायत, ग्राम पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यांचे नियोजन आत्तापासूनच करणे आवश्यक आहे. बोगस मतदार घालवण्यासाठी एसआयआरचा दुसरा टप्पाही यशस्वी करावा, असे आवाहन सभापती शिंदे यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या शहर, दक्षिण व उत्तर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन रविवारी नगर शहरात झाले. यावेळी सभापती प्रा.राम शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा प्रभारी राम सातपुते, शहराच्या प्रभारी व प्रदेश सचिव भैरवी वाघ – पलांडे, आ.विक्रमसिंह पाचपुते, आ.अक्षय कर्डिले, उपमहापौर धनंजय जाधव, यांच्यसह तिन्ही जिल्ह्याचे उपाध्यक्ष, सरचिटणीस, सर्व मोर्चांचे अध्यक्ष शहरातील व जिल्ह्यातील नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

सभापती राम शिंदे पुढे म्हणाले, सध्याच्या आधुनिक काळात समाज मध्यमांना महत्व आले आहे. त्यामुळे भाजपचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता प्रशिक्षित व सक्षम असावा यासाठी पक्षाचे सर्वत्र प्रशिक्षण वर्गाचे आयोजन होत आहे. विरोधकांच्या खोट्या नॅरेटीव्हला योग्यप्रकारे उत्तर देणे आवश्यक आहे. आज अशाप्रकारचे प्रशिक्षण वर्ग इतर कोणत्याच पक्षात होत नाहीत ते जवळपास संपलेच आहेत. त्यांच्या सध्या कार्यकारणीच्या बैठकाही होत नाहीत अशी भयानक परिस्थिती इतर सर्वच पक्षाची झाली आहे. त्यामुळे भाजपमध्ये येण्यासाठी रीघ लागली आहे.

आ.विक्रमसिंह पाचपुते म्हणाले, २०४७ सालच्या विकसित भारताची सर्वात मोठी शक्ती युवक आहे. आज भारतात सर्वात जास्त युवक आहेत म्हणून त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. तरुण पिढीला योग्य दिशा देणे आवश्यक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक चुकीचे नॅरिटीव्ह सेट करत आहेत. त्यास चांगल्या प्रकारे उत्तर देणे आवश्यक आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अल्गोरिदमच्या पुढे जावे लागेल. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक मोठ्या लाभदायक योजना राबवून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यात आले आहे. देशाच्या या वाटचालीमध्ये पक्षाच्या प्रत्येक पदाधिकारीचे योगदान आहे.

बैठकीचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केले. जिल्हास सरचिटणीस अशोक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. बैठकीत ,युवाशक्ती संधी आणि विकसित भारताच्या संकल्पचे अभिनंदन, याचा प्रस्ताव आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मांडला त्यास विश्वनाथ कोरडे यांनी अनुमोदन दिले. तसेच फेक निगेटिव्ह व अपप्रचाराला विकसित गाथा कथनाने उत्तर द्या हा प्रस्ताव आमदार अक्षय कर्डिले यांनी मांडला त्यास उपमहापौर धनंजय जाधव यांनी अनुमोदन दिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles