धनंजय मुंडे यांच्या नव्या व्हिडीओची जोरदार चर्चा, व्हिडीओत धनंजय मुंडे …

गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून काहीसे बाजूला सारले गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत धनंजय मुंडे हे जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्त असल्याने सध्या धनंजय मुंडे हे स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. याचाच एक भाग म्हणून ते जीममध्ये जाऊन घाम गाळत आहेत. यामुळे धनंजय मुंडे यांच्यात कमालीचे ट्रान्सर्फोमेशन दिसून येत आहे. यापूर्वीही धनंजय मुंडे हे तसे फिट राहण्याकडे भर देत होते. मात्र, धनंजय मुंडे यांचा हा नवा लूक त्यापेक्षाही चर्चेचा विषय ठरत आहे

धनंजय मुंडे यांनी जीममधील हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये कवितेच्या काही ओळी लिहल्या आहेत. काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे… भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे… निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे… हरवण्याची आता बिशाद कुणाची… स्वतःशी सुद्धा लढतो आहे…, असे धनंजय मुंडे यांनी इन्स्टा पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील विविध प्रकरणांमुळे प्रचंड वादात अडकले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागणे, यामुळे त्यांच्यावर राजकीय आणि वैयक्तिक पातळीवर मोठे संकट आले होते. बऱ्याच काळानंतर सक्रिय झालेल्या मुंडे यांनी ही पोस्ट टाकून आपण सर्व आरोप, टीका आणि अडचणींनंतरही खचलेलो नाही, लढत राहणार असल्याचा संदेश दिला आहे. “निंदा-दूषणे आता न भिडती” या ओळीतून त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिल्याचे मानले जात आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles