Tuesday, November 11, 2025

नगर-पुणे महामार्गावर भाजपा आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक, एक जण जागीच ठार

भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या कारने एका दुचाकीला धडक दिली असून या अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळके हे जागीच ठार झाले आहेत. सोमवारी (७ जुलै) रात्री १०.३० ते ११ च्या सुमारास हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सागर सुरेश धस हे आष्टी येथून पुण्याला जात असताना सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारने नितीन शेळके यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात शेळके यांच्या मृत्यू झाला असून सुपा पोलीस या अपघात प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सागर धस हे सोमवारी रात्री आष्टीवरून पुण्याला जात होते. यावेळी सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामरगाव परिसरात त्यांच्या कारने एका दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुपा पोलीस या अपघात प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच याप्रकरणी गु्न्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं आहे.दरम्यान, आमदार पुत्राच्या भरधाव कारने दुचाकीस्वाराला उडवल्याची बातमी आष्टीसह संपूर्ण बीड जिल्ह्यात पसरली असून यावरून सागर धस व आमदार सुरेश धस यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या अपघातप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

रात्री उशीरा अपघाताची घटना घडलीये. मात्र, गुन्हा दाखल करण्याचे काम आता सुरू असल्याने यादरम्यान नेमके काय घडले यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. आमदार सुरेश धस यांचा मुलगा नेमका कुठे आहे, याबाबतही अजून काही माहिती ही पुढे मिळू शकली नाहीये. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस हे चर्चेत आले होते. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही गंभीर आरोपही केली होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles