सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती निघाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.भारत पेट्रोलियममध्ये फंक्शनल कंसल्टंट आणि MS अॅप डेव्हलपमेंट कंसल्टंट पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी सर्वात आधी अधिसूचना वाचा त्यानंतर अर्ज करावेत. तुम्ही bharatpetroleum.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
बीपीसीएलमधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २३ जुलैपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी
बीपीसीएलमधील या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाहीये. त्यामुळे परीक्षेशिवाय सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.
बीपीसीएलमधील या नोकरीसाठीची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असते. त्यामुळे आधी अधिसूचना वाचा. त्यानंतर अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३८ वर्षे असावी.
फंक्शनल कंसल्टंट आणि ज्युनिअर कंसल्टंट पदासाठी १,०७,८३० ते १,४३,८०० रुपये पगार मिळणार आहे. AP BASIS कंसल्टंट आणि सिनियर कंसल्टंट पदासाठी १,२६,२०० ते १,६२,९०० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षा (जर आवश्यक असेल तर), इंटरव्ह्यू आणि कागदपत्रे पडताळणीद्वारे केली जाणार आहे.
BPCL मधील नोकरीसाठी अर्जप्रक्रिया
तुम्ही bharatpetroleum.in या वेबसाइटवर जावे.
यानंतर Recruitment of Consultants 2025 वर क्लिक करा.
यानंतर अर्ज भरा आणि कागदपत्रे सबमिट करा.


