जिल्हा वाचनालय, गांधी मैदान, पटवर्धन चौक, अमरधाम पर्यंत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामधील धार्मिक स्थळे रस्त्याच्या कडेला घ्यावी – नागरिकांची मागणी
अहिल्यानगर : शहरातील जिल्हा वाचनालय, गांधी मैदान ,पटवर्धन चौक, गाडगीळ पटांगण, अमरधाम गेट पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असून हे काम आता अंतिम टप्प्यात येत आहे परंतु या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी धार्मिक स्थळे असल्यामुळे रस्ता बारीक होणार आहे त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होणारा असून नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे हा रस्ता मध्यवर्ती शहरातील असून चारही बाजूंनी बाजारपेठा, शाळा, न्यायालय आहे त्यामुळे जिल्हाभरातून नागरिक या ठिकाणी येत आहे पुढील २० वर्षाचा विचार करून रस्त्याच्या मधोमध असलेली धार्मिक स्थळे हटवून रस्त्याच्या कडेला घ्यावी जेणेकरून वाहतुकीला अडचण ठरणार नाही व एकसारखा सरळ रस्ता होईल तरी याचा विचार महापालिका प्रशासनाने करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे


