आचारसंहिता संपली,जिल्हा परिषदेत रखडलेल्या बदल्या होणार
अहिल्यानगर, 23 मे 2026: विधानपरिषद आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आलेली कृषी, आरोग्य, पशुसंवर्धन आणि ग्रामीण पाणीपुरवठा या चार विभागांची बदली प्रक्रिया सोमवार, दि. 25 मे 2026 रोजी होणार आहे. प्रशासनाने याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
यापूर्वी निर्गमित वेळापत्रकानुसारच ही प्रक्रिया पार पडणार आहे. 25 मे रोजी सकाळी 9.45 वाजल्यापासून विभागनिहाय बदली प्रक्रिया सुरू होईल.
विभागनिहाय वेळापत्रक असे:
1. कृषी विभाग: सकाळी 9.45 वा.
2. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग: सकाळी 10.15 वा.
3. पशुसंवर्धन विभाग: सकाळी 10.30 वा.
4. आरोग्य विभाग: सकाळी 11.00 वा.
सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिनस्त तालुकास्तरीय यंत्रणा व संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचित करावे व नियोजित वेळेनुसार कार्यवाही सुनिश्चित करावी, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.


