रोजच सीएनजी, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे दर वाढत असले तरी राज्याच्या अनेक भागात इंधन मिळत नाहीये. राज्यातील अनेक पेट्रोलपंप इंधना अभावी बंद झाले आहेत. अनेक पेट्रोल पंपांनी तर पेट्रोल संपलं… डिझेल संपल्याचे बोर्ड लावले आहेत.
राज्यात येत्या दीड महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाव दीडशे रुपयांच्या वर जाणार असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी करून खळबळ उडवून दिली आहे. मीडियाशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.
पाच- सात नाही, तर पुढच्या दीड महिन्यामध्ये 150 रुपयेपर्यंत डिझेल झालेल दिसेल. 170 रुपये पेट्रोल झालेले दिसेल, असा दावा करतानाच ज्या पद्धतीने देश चालवला जात आहे, हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे. देशातील मध्यमवर्गीय माणूस हा मरणार आहे. याला मारण्यासाठी ते सरकार आलेलं आहे, असा हल्लाच मनोज जरांगे यांनी चढवला आहे.
इंधन तुटवडा नाही असे सरकार सांगत असेल, केंद्रीय मंत्र्यांकडून तुटवडा नाही असं सांगितलं जात असेल, भाजपकडून असं सांगितलं जात असेल… तर आरसी बुक पाहून डिझेल का दिलं जात आहे? शेतकरी ट्रॅक्टर कशासाठी वापरतो? त्याला आरसी बुक पाहून जर इंधन देत असतील तर याचा अर्थ तुटवडा आहे, हे मान्य करा. भविष्यात ते होणार आहे. एअर इंडियाची विमान सेवा कमी झाली आहे. अनेक विमान सेवा नागपूरवरूनही रद्द होतील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.


