अहिल्यानगर शहरातील मावा व सुगंधीत तंबाखु विक्रेत्यावर गुन्हे शाखेची कारवाई
आरोपीकडून 2,84,920/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखाव तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, विजय ठोंबरे, रविंद्र घुंगासे अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर शहरात अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले.
दिनांक 10/07/2025 रोजी पथक अहिल्यानगर शहरातील अवैध धंदयाची माहिती घेत असताना, पथकास गोपनीय मिळाली की, इसम नामे विनोद मुर्तडकर हा कोंढया मामा चौकातील नवनाथ पान स्टॉल येथे तसेच त्याचे पाठीमागील बाजुस सुगंधीत तंबाखु व सुपारीपासुन इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करून विकत आहे. पथकाने पंचासमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री केली असता नवनाथ पान स्टॉलचे पाठीमागे एक इसम हा इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करताना मिळून आला.परंतु पोलीस पथकाची चाहुल लागताच तो मागील बाजुने पळून गेला.पथकाने घटनाठिकाणावरून 2,84,920/- रू किंमतीचा मुद्देमाल त्यात इलेक्ट्रीक मशीन व मोटार, 5 किलो सुगंधीत मावा, 10 किलो सुगंधीत तंबाखु, 70 किलो कापलेली सुपारी, रत्ना सुगंधीत तंबाखु, 10 किलो ज्योती चुना व एक वजनकाटा असा मुद्देमाल जप्त केला.
पथकाने घटनाठिकाणी विचारपूस केली असता जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा 1) विनोद मुर्तडकर, रा. श्रीराम चौक, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर पुर्ण नाव माहित नाही (फरार) याचा असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेविरूध्द तोफखाना पोलीस स्टेशन गुरनं 720/2025 बीएनएस 2023 चे कलम 123, 223, 274, 275 प्रमाणे दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदर कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, व मा.श्री.अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


