शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्त यांना निवेदन
महानगरपालिकेच्या वतीने शहर व उपनगरातील सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण करणा-या संस्थेचा ठेका रद्द करण्यात यावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने सर्वेक्षण सुरु असलेले काम बंद पाडण्यात येईल – संभाजी कदम .
अहिल्यानगर – आपल्या अहिल्यानगर म.न.पा. च्या वतीने शहर व उपनगर परिसरातील सर्व मालमत्ता धारकाचे नव्याने फेर सर्वेक्षण करण्यासाठी म.न.पा. ने एका खाजगी संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेचे कर्मचारी घरोघरी जावून नागरीकांकडून माहिती जमा करत होते, परंतू ब-याच ठिकाणी ही माहिती भरुन झाल्यानंतर त्या कर्मचारी यांच्याकडून मालमत्ता पाहुन पैशाची मागणी सुरु झाली, अनेकांनी पैसे सुद्धा दिले, परंतू म.न.पा.ने आधीच आवाहन केले होते की, ही सर्व माहितीसाठी नागरीकांना कोणतेही पैसे देवू नये, मग हा काय प्रकार सुरु आहे? तेव्हा अशा संस्थेवर तातडीने कारवाई करुन त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी शिवसेना करत आहे. अन्यथा शिवसेना ही सुरु असलेले काम बंद पाडेल याची नोंद घ्यावी.असा इशारा शिवसेनेच्या वतीने माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिला आहे
शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे ,शहरप्रमूख सचिन जाधव ,माजी शहरप्रमुख संभाजी कदम ,संजय शेडगे,बाळासाहेब बोराटे ,दत्ता कावरे ,शाम नळकांडे ,संतोष गेनप्पा ,सचिन शिंदे ,संग्राम शेळके ,पोपट पाथरे आदी उपस्थित होते


