एखादा मंत्री ओबीसी म्हणून टार्गेट करणे योग्य नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जरांगेंना इशारा

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित ‘तिरंगा रॅली’नंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची ठामपणे पाठराखण केली. यासोबतच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले.

मनोज जरांगे यांनी महसूलमंत्र्यांवर केलेल्या आरोपांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी अत्यंत स्पष्टपणे सांगतोय… सरकार हे संविधानानुसारच चालते, ते कुठल्याही दबावाने चालत नाही. मात्र, सरकार प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेण्यास नेहमी तयार असते. आमच्या सरकारने मराठा समाजासाठी जे ऐतिहासिक काम केले आहे, ते आजवर इतर कुठल्याही सरकारने केलेले नाही.”त्तर देत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले.

बावनकुळे यांच्यावर झालेल्या आरोपांवर अधिक स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले, “कोणत्याही मंत्र्याकडे एखादी तक्रार आल्यास त्याची योग्य चौकशी करणे ही संविधानाने मंत्र्यावर सोपवलेली जबाबदारी असते. मराठा आरक्षण प्रकरणी गठीत करण्यात आलेली समिती ही संपूर्णपणे पुराव्यांच्या आधारावर काम करते. ही समिती सरकारला बांधील नसून ती केवळ न्यायालयाशी बांधील आहे; ती सरकारला रिपोर्ट सादर करत नाही. त्यामुळे एखादा मंत्री केवळ ‘ओबीसी (OBC)’ समाजाचा आहे म्हणून त्याला अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.”मुख्यमंत्र्यांनी पुढे ठामपणे सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काहीही हेतुपूर्वक केलेले नसून, त्यांनी एक मंत्री म्हणून आपले घटनात्मक कर्तव्य पूर्ण केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles