अहिल्यानगर शहरात जमीन व्यवहारात डॉक्टरची 14 कोटींची फसवणूक

जमीन व्यवहारात डॉक्टरची 14 कोटींची फसवणूक; नेवाशाचा तरुण गजाआड, पाच दिवसांची पोलीस कोठडी

अहिल्यानगर,: जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सावेडी येथील डॉक्टरची तब्बल 14 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीला येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अमोल बबन जाधव (वय 40, रा. मोरगव्हाण, ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याला सोमवारी (15 जून) येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची (20 जूनपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉक्टरची फसवणूक
डॉ. अनिल सूर्यभान आठरे (वय 73, रा. झोपडी कॅन्टीन, सावेडी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी 8 नोव्हेंबर 2025 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 30 जणांच्या टोळीविरोधात कटकारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

एमआयडीसीतून अटक
या गुन्ह्यातील मुख्य संशयित अमोल जाधव हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. तो एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने जाधव याला एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बनावट कागदपत्रांचा वापर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित आरोपी भाजपाचा माजी नगरसेवक स्वप्नील रोहीदास शिंदे, अमोल जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून कट रचला. संशयित आरोपींनी डॉ. आठरे यांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींनी बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती दाखवल्या.

इतकेच नाही, तर बनावट मालक उभे करून, त्यांच्या बनावट सह्या करून डॉ. आठरे यांना दस्त हस्तांतरित केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी डॉ. आठरे यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले. त्यांची एकूण 14 कोटी 66 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles