क्रिकेटच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला;​ नगर शहरातील घटना

​अहिल्यानगर-शहरातील न्यू आर्ट्स कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान एका तरुणावर जीवघेणा हल्ला होण्यात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, विद्या विहार कॉलनी येथे राहणारा पंधरा वर्षीय महाविद्यालयीन तरुण यथार्थ कल्पेश परदेशी हा आपल्या मित्रासोबत न्यू आर्ट्स कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. भवानी टायगर्स आणि हरिहरेश्वर किंग्स या दोन संघांमध्ये सामना सुरू असताना एका चेंडूवरून खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. सामना संपल्यानंतर वाद मिटवण्याच्या बहाण्याने आरोपींनी यथार्थला कॉलेजच्या मुख्य गेटवर बोलावून घेतले.

​तेथे दबा धरून बसलेल्या कुणाल घेगडे याने यथार्थच्या जबड्यावर क्रिकेटच्या बॅटने जोरदार प्रहार केला. त्यानंतर सोहम बिंगी याने स्टम्पने त्याच्या हातावर आणि खांद्यावर गंभीर मारहाण केली, तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेल्या ओम घेगडे आणि हर्ष देवळालीकर यांनी यथार्थला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार पाहून मित्र मदतीला धावून आले असता सर्व आरोपी दुचाकीवरून पळून गेले.​जखमी यथार्थला तातडीने साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुणाल घेगडे, ओम घेगडे, सोहम बिंगी आणि हर्ष देवळालीकर यांच्याविरुद्ध मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल लोणारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंटला या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles