राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाची अपडेट,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात 30 जुलैच्या आत कर्जमाफी मिळेल, अशी चर्चा होती. त्यानंतर राज्य सरकारने कर्जमाफीच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं आहे. कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्‍यांनी मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्‍यांच्या घोषणने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “उद्याच आम्ही कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करू. अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे म्हणून उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. तांत्रिक अडचणी राहिलेल्या नाहीत. आयकर बाबतचा डेटा देखील परवा प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोणतीच अडचण नाही. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जाणार, बोगस बियाणं प्रकरणात कारवाईचा धडाका सुरू आहे. 11 हजार 584 तक्रारी प्राप्त आहेत. 81 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...”

खरीप 2025 मध्ये सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेवर सर्वाधिक तक्रारी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळमधून आल्या आहेत. 11,584 तक्रारींपैकी 8,192 प्रकरणांची तपासणी झाली असून 763 नमुने अमान्य आढळले. यावरून 81 कंपन्यांविरोधात FIR दाखल करण्यात आले आहेत, अशी माहितीसुद्धा समोर आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles