शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर ,कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीत ६ लाख ३० हजार शेतकऱ्यांना लाभ

राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’चा तिसरा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असून, या अंतर्गत सहा लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका विशेष कार्यक्रमात डिजिटल प्रणालीद्वारे ५,०८६ कोटी रुपयांचा निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केला आहे कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ६ लाख ३६ हजार ३६ शेतकऱ्यांची बँक खाती पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहेत. थेट लाभ हस्तांतरण पद्धतीचा वापर केल्यामुळे कोणताही मध्यस्थ न राहता ही संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात जमा झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऐन गरजेच्या काळात मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.आतापर्यंत १०हजार ११५ कोटींचे वाटप पूर्ण
पहिला आणि दुसरा टप्पा मिळून राज्य सरकारने आतापर्यंत राज्यातील एकूण १२.५६ लाख (१२ लाख ५६ हजार) शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल १० हजार ११५ कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम यशस्वीरित्या वितरित केली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी पुढील टप्प्यांची प्रक्रिया देखील वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना पुन्हा नवीन पीक कर्जासाठी पात्र बनवण्यासाठी राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना’ सुरू केली आहे.आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पारदर्शक पद्धतीने आणि जलद गतीने प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीचा लाभ पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles