राज्यात राजकीय चर्चांना उधाण; माजी मंत्री बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार !

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी होऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये काहीतरी उथलपालथ झाल्याची चर्चा आहे. त्याचदरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय कोअर कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकात पाटील यांची भेट घेतली. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांच्या भेट कोणत्या कारणामुळे झाली, थोरात यांनी चंद्रकांत पाटील यांची भेटीचं कारण काय आहे, यावरून चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चांनी जोर धरला होता. त्यात आता चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर या चर्चांना पेव फुटला होता. दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भेटीचं कारण काय होतं याची माहिती दिली आहे. या भेटीमागील कारण काय, माजी मंत्री थोरात यांनी यावर प्रतिक्रिया देत ‘होय, आपण चंद्रकांतदादांना भेटलो, असल्याचे म्हटले आहे. मात्र ही भेट कोणतीच राजकीय भेट नव्हती असं थारोत म्हणाले आहेत.

“होय, भाजपच्या चंद्रकांतदादांना भेटलो. माझ्या शैक्षणिक संस्था आहे. अभियांत्रिकी कॉलेजचे काही प्रश्न होते. प्राचार्य, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते. यासंदर्भातील काही प्रश्न सोडवायचे होते, यासाठी त्यांना भेटण्यासाठी गेलो.” विद्यार्थी हा जनसामान्यांशी निगडीत आहे. त्यामुळे या भेटीमागे काही राजकारण असायचे कारण नाहीये. चंद्रकांत पाटील याबाबत कधीही राजकारण करत नाही, असेही थोरात म्हणालेत.

काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. त्यातील काही जण नाराज आहेत अशी चर्चा ऐकायला येत असतात. यावर बाळासाहेब थोरात यांना प्रश्न करण्यात आला, त्यावेळी त्यांनी प्रतिप्रश्न करत, काँगेसमध्ये कुठे नाराजी आहे? आम्ही एक आहोत. काम करत चाललो आहोत, असे स्पष्ट केलं.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles