Friday, November 14, 2025

नगर तालुक्यातील माजी पंचायत समिती सभापती सह नगर शहरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी सभापती नंदा शेंडगे, माजी नगरसेवक दशरथ शिंदे यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर – बाबुशेठ टायरवाले

अहिल्यानगर : शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुका पंचायत समिती माजी सभापती नंदा शेंडगे, मनपाचे माजी नगरसेवक दशरथ शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पक्षातील दीडशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, या मेळाव्यातही इतर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते प्रवेश करणार आहे जिल्हा परिषद महापालिका व पंचायत समिती नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम करावे असे प्रतिपादन बाबुशेठ टायरवाले यांनी केले
अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी सभापती नंदाताई शेंडगे व माजी नगरसेवक दशरथ शिंदे यांच्या दीडशे कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी संपर्कप्रमुख शंभूराज देसाई, सचिव संजय मोरे, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, अभिषेक भोसले, अमोल हुंबे उपस्थित होते यावेळी
राहुरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी अनिल शेंडगे, माजी नगरसेवक देवळाली प्रवरा गणेश भांड, हरिभाऊ हापसे, राधाबाई हापसे, पोपट शेळके, अर्जुन शेटे, श्रीकृष्ण भुजाडे, नरेंद्र रिंगे, पप्पू घोलप, प्रमोद बर्डे, सोमनाथ खांदवे, सुनील भांड, रवींद्र शिंदे, संजय बर्डे, किरण देशमुख, किशोर मोरे, सिद्धार्थ तनपुरे, गणेश पवार, राजेंद्र भुजाडे, बबलू कारंडे, संकेत घुले, नगर तालुक्यातील संगीता जाधव, सुनिता सासोडे, राणी गरुडकर, इंदुबाई लाटे, अनिता भोर, सुनीता भालसिंग, शशिकला इंगळे, शोभा माने आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles